जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जामखेड तालुक्यातील खातेदारांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मोफत 7/12 वाटप मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जामखेड तालुक्यात एकूण 49456 एवढे 7/12 असून 71234 एवढे खातेदार आहेत.आज जामखेड तालुक्यातील 31 सजेमधील प्रत्येक 1 गावामध्ये 7/12 चे मोफत वितरण मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.आज जामखेड तालुक्यात 6280 एवढे खातेदारांना मोफत 7/12 चे वाटप करण्यात आले आहे.सदर मोफत 7/12 वाटप हे घरोघरी पुढील कालावधीमध्ये सुरू राहणार असून सर्व खातेदारांना निशुल्क 7/12 वाटप होणार आहे. विशेष म्हणजे ज्या खातेदारांची ऑनलाइन पीक पाहणी झालेली आहे त्यांना अद्ययावत पीक पाहणी सहीत 7/12 मिळाला आहे.
जामखेड तालुक्यातील सदर मोहीम ही डॉ. राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच कर्जत जामखेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
तहसीलदार जामखेड










