जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा समिती, उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका विधी समितीच्यावतीने २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती ते १४ नोव्हेंबर बाल दिवस या कालावधीत प्रत्येक दिवशी जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक उपक्रम घेण्यात येणार आहेत. समाजाला कायद्याची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कायदेविषयक जनजागृती रॅली काडून याची सुरुवात करण्यात येत आहे. असे प्रतिपादन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनिकांत जगताप यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, १७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर व जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमानिमित्त कायदेविषयक जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून एन.सी.सी. च्या रॅलीचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश श्री. रजनीकांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे ,गट विकास अधिकारी पी.एल. पोळ, जामखेड वकील बारचे अध्यक्ष अॅड. संग्राम पोले, जामखेड महाविद्यालयचे प्राचार्य अविनाश फलके, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके, ल.ना. होसिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्यध्यपक पी. एन. तांबे, पर्यवेक्षण डी.एन. साळवे, अॅड. जे.एम. कोल्हे, व्ही. वाय. पाटील, सी. ए. ढाळे, सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप नागरगोजे, जयभाय पी.व्ही., पी.व्ही. गोले., पी.के.राऊत, अमीर पठाण, पी.बी. बोलभट, एस.एन.बोरा., एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, एस.ओ. अनिल देडे, टी.ओ. मयूर भोसले, प्रा. रमेश बोलभट, प्रा. विनोद सासवडकर, विधी वरिष्ठ लिपिक विनोद नाईकनवरे, दिपक बिडगर, सहायक फौजदार शिवाजी भोस, पोलीस कॉन्स्टेबल धनराज बिराजदार,अरुण पवार, जामखेड महाविद्यालय, ल.ना. होशिंग विद्यालय व श्री. नागेश विद्यालयाचे एन.सी.सी. छात्र उपस्थिती होते.
संपूर्ण देशभरामध्ये न्यायालय विधी समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन एक महिनाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये समाजाला विविध कायद्यांची माहिती होणार असून गरजू लोकांच्या कायदेविषयक अडचणी सुटणार आहेत. सामाजिक आर्थिक दुर्बल असलेल्या वंचितांना कायदेविषयक मार्गदर्शन होणार आहे, लोक न्यायालल्याचे फायदे समाजाला समजले पाहिजेत, कायदयाची माहिती सर्वांना झाली पाहिजे व समाजाच्या अडचणी सुटल्या पाहिजेत असे मनोगत न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी केले व एन.सी.सी. विभागाने उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.
याबरोबरच रॅलीमध्ये लोक न्यायालयचे फायदे, मानसिक आरोग्य कायदा 1987, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009, मध्यस्थी प्रक्रिया व फायदे, रॅगिंग संदर्भातील कायदे, यांचे पोस्टर, कायद्याची माहिती घोषवाक्य याद्वारे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल देडे व आभार मयुर भोसले मानले.










