Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या राज्यात 14 हजार 739 सहकारी संस्थांच्या निवडणुका

राज्यात 14 हजार 739 सहकारी संस्थांच्या निवडणुका

0
210
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज 
राज्यात दुसर्‍या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. ज्या सहकारी संस्थांवर प्रशासक आणि प्राधिकृत अधिकारी कार्यरत आहेत त्या संस्थांच्या निवडणुकांचाही समावेश दुसऱया टप्प्यात करण्यात आल्याने राज्यात एकूण 14 हजार 739 सहकारी संस्थांच्या निवडणुका या टप्प्यात होणार असल्याने पुढील दोन महिन्यांत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.
या टप्प्यातील निवडणुका होणाऱया सहकारी संस्थांची संख्या 12 हजार 332 इतकी आहे. प्रशासक अथवा प्राधिकृत अधिकारी कार्यरत असलेल्या 2 हजार 407 सहकारी संस्थांच्या निवडणुकाही सुरू करण्यात येत असल्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी आज जाहीर केले. जिल्हा निवडणूक आराखडय़ात दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत संचालक मंडळाची, नियुक्त प्रशासक अथवा प्राधिकृत अधिकाऱयांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांचा समावेश टप्पा क्रमांक दोनमध्ये केलेला आहे.
सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीसाठी समाविष्ट केलेल्या या संस्थांशिवाय इतर टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया परस्पर सुरू करू नये. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू न करण्याबाबत न्यायालयाचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!