लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेब ढवळे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
210
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
लोकप्रिय आमदार रोहित (दादा)  पवारांच्या वाढदिवसानिमित्त सावरगावचे माजी उपसरपंच दादासाहेब ढवळे यांनी आपल्या वडिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा हनुमानवस्ती येथील सर्व विद्यार्थ्याना वही, इंग्रजी अंकलिपी, मराठी अंकलिपी व पेन या शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन आला.
२९  सप्टेंबर कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार

रोहित (दादा) पवार यांचा वाढदिवस. वाढदिवसाला हार, तुरे, बुके, बॅनर, पोस्टर इत्यादी वर खर्च करण्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्याना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्याचे आवाहन  रोहितदादा पवार यांच्याकडुन करण्यात आले होते.

त्याला प्रतिसाद देत.सावरगावचे माजी उपसरपंच तथा गणेश कंस्ट्रकशनचे सर्वेसर्वा दादासाहेब अंकुश ढवळे यांनी त्यांचे वडील अंकुश दगडू ढवळे  यांच्या शुभहस्ते

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवस्ती येथील सर्व विद्यार्थ्याना, वही, इंग्रजी अंकलिपी, मराठी अंकलिपी व पेन या शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.

यापूर्वी ही त्यांनी स्वखर्चातुन शालेय रंगकामामासाठी मोलाची मदत केली होती. यामुळे शाळेची रंगरंगोटी होऊन बोलक्या भींती झाल्या शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. लहान लहान मुलांना शाळेविषयी आवड निर्माण झाली.दादासाहेब अंकुश ढवळे यांचे अनुकरण करुन, या कोरोना कालावधीनंतर सुरु होत असलेल्या शाळेला नवसंजीवनी देण्यासाठी इतरांनीही वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातुन शाळा विकासात पुढाकार घेण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण व्ही.बी.यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here