वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा चार आॅक्टोबर रोजी एल्गार मोर्चा

0
198
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
वंचित बहुजन आघाडी, ओ.बी.सी. संघटना, भटके विमुक्त आघाडी व मुस्लिम संघटनांच्या वतीने दि. ४ आॅक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
  दि. ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जामखेड बसस्थानक येथून निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा तसेच वंचित बहुजन आघाडी-भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड. डॉ. अरूण जाधव हे करणार आहेत.
एल्गार मोर्चाच्या मागण्या:ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना होऊन त्यांचे आरक्षण जाहीर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाची अमलबजावणी करावी. प्रत्येक भटके विमुक्त कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करावी. पारधी विकास आराखडा योजनेची अंमलबजावणी करावी. भटके विमुक्त व आदिवासींना स्थानिक चौकशी करून जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड द्यावे, मतदार यादीत समावेश करावा. व राहण्यासाठी दोन गुंठे जागा द्यावी. संजय गांधी योजनेचे रखडलेले प्रस्ताव निकाली काढवेत, व या योजनेचे मासीक ३ हजार रूपये अनुदान द्यावे. लोककलावंताचा कोटा वाढवावा व त्यांनाही ३००० रूपये मासिक अनुदान द्यावे. तसेच वारकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदानही त्वरित सुरू करावे. दलित वस्ती योजनेचा निधी वाढवावा, तो निधी इतरत्र न वळवता दलित वस्तीतच कामे करावीत. अशा विविध मागण्यांसाठी या यल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध भागातून नेतेमंडळी यामोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी मोर्चासाठी ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी व भटके, निराधार, लोककलावंत व वारकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here