सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!!

0
350
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 घाटमाथ्यावर सोयाबीन पीक काढणी सुरू आहे पण सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक पाण्यात आहे. अनेकांनी तर काढलेले सोयाबीन पीकाच्या मुठी पाण्यात आहेत. काही ठिकाणी सोयाबीन सडून चालले आहे तर काही ठिकाणी पिकाला कोंब फुटलेले आहेत. पावसामुळे हाता तोंडाशी काढायला आलेले सोयाबीन पिक पाण्यात गेले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोयाबीन नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी मान्सूनच्या पावसाने लवकरच हजेरी लावली होती. त्यामुळे याही वर्षी मृग नक्षत्रात जवळपास सगळ्यांच्या पेरण्या झाल्याने पाऊसकाळ चांगला राहुन उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती मध्यंतरी पावसाने ओढ दिली व आता सततच्या पावसामुळे
सर्वत्र पाणीच पाणी झाले. पीके पाण्यात आहेत.
त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला. शेतातही सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे सोयाबीनचे सर्व पिक पाण्यात गेले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
वाढत्या बियाणांच्या किंमती, खतांचे चढे भाव वाढती महागाई या परिस्थितीत बळीराजाने काळ्या आईची ओटी भरली पिके काढणीला आलेली आहेत असे आसतानाच आता अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अनियमित पणामुळे हिरावून घेतला आहे. सध्या
सोयबीन पीक काढणीला आले आहे पण गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस असल्याने पीके पाण्यात सडून चालली आहेत. सोयाबीन पीक पंधरा दिवसांपुर्वी साडेदहा ते आकरा हजार आसताना आता मात्र साडेचार ते पाच हजार रुपये भाव आलेला आहे. त्यामुळे निसर्गाबरोबरच केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. साकत, सावरगाव, दिघोळ, जातेगाव, देवदैठण, नायगाव, नाहुली, मोहा या परिसरात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here