चाळीस टक्के व्याजदराने पैसे देणार्‍या खासगी सावकाराविरूद्ध गुन्हा दाखल

0
305
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
खासगी सावकाराकडू घेतलेल्या व्याजाच्या पैशावरून होत आसलेल्या त्रासाला कंटाळून ऐका तरुणाने खाजगी सावकाराच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चक्क व्याजदर ४० % होता दोन दिवसातील सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जामखेड पोलीसांनी खाजगी सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे.
पोलीस सुत्रांकडूनसमजलेली माहिती अशी की दि. २२/७/२०२१ रोजी ते दि. २३/९/२०२१ रोजी दरम्यान आरोपी दिपक अशोक चव्हाण याने १ लाख ३० हजार रुपये हे शहरातील रसाळनगर येथे राहणारे गणेश अभिमान भानवसे यांना दर महीना ४० टक्के व्याजाने दिले होते. त्या पोटी फिर्यादीकडून बँकेचे चार चेक हमीपोटी घेवून, दिलेल्या पैश्याचे व्याज व हफ्ते हे रोख रक्कम समक्ष व मोबाईल वरील फोन पे या अँप्लिकेशन द्वारे घेतले. तसेच सावकार दिपक चव्हाण याने गणेश भानोसे यास धमकी देवून, बळजबरीने त्यास टी.व्ही.चे दुकानात घेवून जावून एल ए डी टी व्ही उचलुन घेऊन गेला. तसेच सदरचा टी. व्ही. घेऊन गेला आसल्याचे कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला. तसेच त्यानंतर ही पैश्याचे व्याज दे असे म्हणून दि. 15/09/2021 रोजी पावेतो पैश्याचे व्याज फिर्यादीचे मो. नं. 9850457333 या नंबरवरील फोन पे अँप्लीकेशन द्वारे आरोपीकडील मो. नं. 9850752777 या नंबर वरील फोन पे अँप्लीकेशन द्वारे घेतले आहे. तसेच दि. 23/09/2021 रोजी दिपक चव्हाण याने गणेश भानोसे हा त्याचे घरी नसताना त्याचे घरात बळजबरीने घूसून मोठमोठ्याने शिवीगाळ करून गणेशच्या पत्नीस म्हणाला की, तुझा नवरा कोठे गेला. त्याला माझे पैसे व त्या पैश्यावरील व्याज द्यायला सांग, नाही तर मी त्यास जिवे मारीन अशी धमकी दिली. यानुसार गणेश अभिमान भानवसे वय 34 वर्ष रा. रसाळनगर, नगर रोड, जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिपक अशोक चव्हाण रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रोड, जामखेड ता. जामखेड याचे विरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.
चौकट
खाजगी सावकारकीच्या विरूद्ध दोन दिवसात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. यावरून जामखेड तालुक्यात खाजगी सावकारकीचे जाळेच असल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सावकारकीच्या विरूद्ध हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अनेकांचे संसार सावकाच्या अत्याचारातून सुटून उभे राहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here