जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा २३ सप्टेंबर गुरूवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
नामदेव राऊत यांनी नुकताच भाजपाचा राजीनामा दिला होता. व लवकरात लवकर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार उद्या गुरुवारी मुंबई येथे सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व काही स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्या राऊत बरोबर भाजपाचे आणखी किती जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.