कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात नगर जिल्ह्यातून होण्याची शक्यता – विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे, कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना

0
260
जामखेड न्युज – – – – 
 जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे यांनी आज कोरोना आढावा बैठकीत दिले. तसेच सध्याची दररोज वाढणारी रूग्ण संख्या पाहता तिसऱ्या लाटेची सुरुवात नगर जिल्ह्यातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत विभागीय आयुक्त गमे बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र  क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप  निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या निर्बधासोबतच एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील तीस व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सूचित केले. यासोबतच ज्या ठिकाणी कँटोन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तेथे नागरिकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घालणे, दहा टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या परिसरात लॉकडाऊन करणे, आठवडी बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना वस्तू देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, होम आयसोलेशन बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढविणे आदी उपाययोजना अंमलात आणण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here