केसाला धक्का लावाल तर दुसऱ्या दिवशी सरकार बरखास्त होईल

0
501
जामखेड न्युज – – 
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल, असा उघड इशाराच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांंनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय?, असा सलावल त्यांनी यावेळी विचारला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने  कोल्हापूरला  निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता त्याच कराड विश्रामगृहावर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत घोटाळ्यांचा पाढा वाचला. तसंच सरकारने पोलिसांचा गैरवापर करुन माझ्याविरोधात दडपशाही केल्याचा आरोप केलाय.
…तर दुसऱ्या दिवशी सरकार बरखास्त होईल
सदाभाऊ खोत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? मविआ सरकारने लक्षात असू द्याव्यात की, उद्या किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल”
सचिन सावंतांकडून सोमय्यांची खिल्ली
दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांवर पलटवार केलाय. सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात, ती त्यांची जुनी सवय आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली.
“किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात. कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे. याचकरिता बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का? सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी”, असं सचिन सावंत म्हणाले.
किरीट सोमय्यांनी मुफीफांविरोधात कोणत्या घोटाळ्याचा आरोप केलाय?
“मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”
“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here