जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज (सुदाम वराट)
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात धक्कादायक घटना घडली आहे महापारेषणचा पोल अंगावर पडल्याने आनंद प्रभाकर हुलगुंडे वय २५ वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला यामुळे चुंबळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील शिवारातून जाणारी महापारेषणची टाॅवर लाईन आहे. आष्टी १३२ केव्ही ते खर्डा १३२ केव्ही जोडणारी लाईन आनंद हुलगुंडे यांच्या शेतातून जाते पण महापारेषणने हुलगुंडे यांना ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे आमच्या शेतात तो टाॅवर नको असे हुलगुंडे म्हणत होता. रात्रीच्या वेळी दोन ते अडीच च्या आसपास टाॅवर मधील काही पोल हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आनंद याचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते त्याच्या मागे आई वडील, पत्नी व एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. घरातील कर्ता युवक गेल्याने हुलगुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह टाॅवर मध्ये गुंतलेला होता पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. महापारेषणचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दुपारी दोन वाजता पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
चौकट
आष्टी १३२ केव्ह ते खर्डा १३२ केव्ही यांना जोडणारी महापारेषणची टाॅवर लाईन चुंबळी येथून जाते प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचे नुकसान म्हणून टाॅवर बद्दल तीन लाख सहा हजार रुपये चेकने दिले आहेत. आमचे कामही पुर्ण झालेले आहे. पण रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टाॅवरचे सपोर्ट कापले त्यामुळे टाॅवर एका बाजूला कलला व तो हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती महापारेषणचे एक्सक्युटीव्ह इंजिनिअर संतोष चव्हाण यांनी सांगितले.









