जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखात्यात आहे. या रस्त्याच्या परिस्थितीवरून भाजपने जे आंदोलन केले ते केंद्र सरकार म्हणजे भाजपच्या विरोधात आहे हेच खरी आश्चर्याची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया आ. रोहीत पवार यांनी भाजपच्या आंदोलनावर केली.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने जामखेड नगर रस्त्यावरील खड्ड्यात एरंडाचे झाड लावून आंदोलन करून खड्डे न बुजवल्यास अधिका-यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला यावर प्रतिक्रिया देताना आ. रोहीत पवार म्हणाले, पवार साहेबांनी लोकांच्या हितासाठी या रस्त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून ३५० कोटी रुपये मंजूर करून आणले. याचे टेंडर झाले. केंद्राच्या अखात्यात रस्ता असल्याने या रस्त्यावर राज्य सरकारला निधी टाकता येत नाही.
भाजपवाले कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता आंदोलन करतात त्यांनी ज्या विभागाच्या विरोधात पर्यायाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन केले मी गडकरी साहेबांच्या वतीने त्यांच्या विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपच्या आंदोलनाचा निषेध करतो असे रोहित पवार म्हणाले त्यामुळे भाजपाचे आंदोलन भाजपाच्या अंगलट आले आहे.