Sunday, November 22, 2026
Home ताज्या बातम्या पुण्यातील शंभराव्या साहित्य संमेलनाची जामखेडमध्ये नांदी! साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग ल....

पुण्यातील शंभराव्या साहित्य संमेलनाची जामखेडमध्ये नांदी! साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग ल. ना. होशिंग विद्यालयात होणार साहित्यिकांचा मेळा, नियोजन आढावा बैठक संपन्न

0
3
पुण्यातील शंभराव्या साहित्य संमेलनाची जामखेडमध्ये नांदी! साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग  ल. ना. होशिंग विद्यालयात होणार साहित्यिकांचा मेळा, नियोजन आढावा बैठक संपन्न

जामखेड न्युज – – – – – 

पुण्यातील शंभराव्या साहित्य संमेलनाची जामखेडमध्ये नांदी! साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग

ल. ना. होशिंग विद्यालयात होणार साहित्यिकांचा मेळा, नियोजन आढावा बैठक संपन्न

 

पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देश-विदेशात ९९ साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. यातील एक मानाचे नांदी शिक्षक साहित्य संमेलन जामखेड येथे रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हे संमेलन होणार असून, साहित्य क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध साहित्यिक सत्रे आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून जामखेड परिसरातील साहित्यप्रेमींना साहित्याची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.

 

या संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित आढावा बैठकीत विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य गौतम केळकर, बी. ए. पारखे, दत्ता काळे, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, रामचंद्र होशिंग व सूरज कुलकर्णी उपस्थित होते.

 

यावेळी शशिकांत देशमुख व श्रीकांत होशिंग यांनी विविध समित्यांची रचना, साहित्यिक ग्रंथ प्रदर्शन तसेच संमेलनाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. जामखेडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असून, त्याच्या तयारीला आता वेग आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!