Friday, November 20, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला! प्राचार्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक...

जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला! प्राचार्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार, शिक्षक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार! विद्यार्थीप्रिय नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल, मान्यवरांनी केला कार्याचा गौरव

0
1
जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला! प्राचार्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार, शिक्षक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार!  विद्यार्थीप्रिय नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल, मान्यवरांनी केला कार्याचा गौरव

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला! प्राचार्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार, शिक्षक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार!

विद्यार्थीप्रिय नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल, मान्यवरांनी केला कार्याचा गौरव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना प्राप्त झाल्याबद्दल जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, तालुका मुख्याध्यापक संघ तसेच केंद्रप्रमुख यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या यशामुळे जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

या सत्कार समारंभात माजी मुख्याध्यापक श्रीकांत होशिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अस्मिता मॅडम यांनी जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. कोणताही पुरस्कार विनाकारण मिळत नसतो. त्यामागे अनेक वर्षांचे कष्ट, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले समर्पित कार्य असते. विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.
अनंता खेत्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे अस्मिता मॅडम यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार नवनवीन आणि अद्ययावत माहिती आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे.

केंद्रप्रमुख राम निकम यांनी पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवर भाष्य करताना सांगितले की, मुख्याध्यापकांच्या संपूर्ण कामकाजाचे मूल्यमापन करून अशा पुरस्कारासाठी निवड केली जाते. डॉ. भोरे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला आहे.

सत्काराला उत्तर देताना प्राचार्या अस्मिता जोगदंड यांनी हा पुरस्कार केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण जामखेड तालुक्याचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त केली. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, यापुढेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

सनराईज् शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय असल्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना त्याचा मोठा फायदा झाला. आजच्या काळात सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातील माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था सुरू केल्या. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कामही केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याचे मोठे मानसिक समाधान मिळते, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दशरथ कोपनर यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्थेची सुरुवात अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून झाली. अनेक अडथळ्यांवर मात करत संस्था आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून अस्मिता मॅडम यांनी केलेल्या कामाची दखल आता राज्यपातळीवर घेतली गेली आहे, ही जामखेडसाठी अभिमानाची बाब आहे.

या सत्कार समारंभास डॉ संजय भोरे, तेजस भोरे, यश भोरे, माजी प्राचार्य  श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, श्रीराम मुरूमकर, रमेश अडसूळ, प्रवीण गायकवाड, ज्युलफिकार पठाण, पठाण सर, विद्यमान प्राचार्य बी. ए. पारखे, आप्पा शिरसाट, अध्यक्ष दशरथ कोपनर, दत्ता काळे, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, केंद्रप्रमुख राम निकम, माजिद शेख, केशव गायकवाड यांच्यासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील घाडगे यांनी केले, तर प्रा. दादासाहेब मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्राचार्या अस्मिता जोगदंड यांच्या कार्याचा राज्यस्तरावर झालेला गौरव हा जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!