Thursday, November 5, 2026
Home ताज्या बातम्या दिवाळीत विनापरवाना फटाके विकणाऱ्यांची खैर नाही! अहिल्यानगर जिल्ह्यात धडक कारवाईचे आदेश,...

दिवाळीत विनापरवाना फटाके विकणाऱ्यांची खैर नाही! अहिल्यानगर जिल्ह्यात धडक कारवाईचे आदेश, जामखेडसह सर्व तालुक्यांना सतर्कतेच्या सूचना!

0
2
दिवाळीत विनापरवाना फटाके विकणाऱ्यांची खैर नाही!  अहिल्यानगर जिल्ह्यात धडक कारवाईचे आदेश, जामखेडसह सर्व तालुक्यांना सतर्कतेच्या सूचना!

जामखेड न्युज – – – – 

दिवाळीत विनापरवाना फटाके विकणाऱ्यांची खैर नाही!

अहिल्यानगर जिल्ह्यात धडक कारवाईचे आदेश, जामखेडसह सर्व तालुक्यांना सतर्कतेच्या सूचना!

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करताना नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. विनापरवाना फटाक्यांची साठवणूक व विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांविरुद्ध स्फोटक नियम २००८ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्र पाठवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परवानगीशिवाय फटाक्यांची साठवणूक व विक्री सुरू राहिल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा अनधिकृत फटाका विक्री केंद्रांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनधिकृत फटाका साठवणूक व विक्री केंद्रांविरुद्ध स्फोटक नियम २००८ मधील तरतुदींनुसार कारवाई करावी. तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!