जामखेड न्युज – – –
मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परम बिर सिंग यांनी शंभर कोटी रुपये वसुलीच्या आरोपानंतर सीबीआय चौकशी सुरू असलेले राज्याचे माजीगृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय कडून क्लीनचिट दिल्याचे वृत्त असल्याने देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांची परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत सीबीआयने चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे..
काय आहे आ. रोहित यांचे ट्विट..
सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो!
आ.रोहित पवार यांनी ट्विट मधे कुठल्याही विषयाचा नेमका संदर्भ दिलेला नसला तरी अनिल देशमुख यांना सीबीआय कडून क्लिनचिट मिळाली असल्याच्या वृत्ता नंतर त्याचे आलेले ट्विट ‘सूचक’ असेच आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुप्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया बंगल्या जवळ स्फोटक जिलेटीन असलेली वाहन सापडल्यानंतर आणि त्या प्रकरणात सचिन वझे यांचे आलेले नाव, हिरेन मनसुख हत्या, आणि डान्सबार्स कडून शंभर कोटींची वसुली टारगेट या विषयाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोपांची आणि टीकेची राळ उडवली आणि शेवटी सीबीआय कडून चौकशीचा आदेश निघताच त्यांना गृहमंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. सीबीआयने देशमुख यांची चौकशी परमवीर सिंग यांच्या शंभर कोटी वसुली बाबतच्या लेखी पत्रावर सुरू केली होती. या चौकशीसाठी भाजप आग्रही होते. मात्र आता याविषयावर सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे वृत्त आल्यानंतर आ.रोहित पवार यांनी लागलीच सूचक ट्विट करत भाजपवर तोंडसुख घेतले आहे.









