Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या लाखों रुपये किंमतीचा गांजा जप्त..!! ऊसाच्या शेतात लपवून ठेवला गांजा-चंदनाची शेकडो...

लाखों रुपये किंमतीचा गांजा जप्त..!! ऊसाच्या शेतात लपवून ठेवला गांजा-चंदनाची शेकडो गाठोडी!!!

0
244
जामखेड न्युज – – –
 पांढरीपुल- शेवंगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकरवाडी शिवारात ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेली गांजाची पॅकिंग करून ठेवलेली शेकडो गाठोडी पोलिसांनी रविवारी सकाळी जप्त केली आहेत. यात काही चंदनाची लाकडे असलेली पण गाठोडी आहेत. साधारण पाचशेच्या वर पॅकिंग करून ठेवलेला हा मुद्देमाल बापू आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांच्या मालकीच्या शेतातील ऊसाच्या मध्ये लपवून ठेवला होता. साधारण पाचशे किलोच्यावर हा गांजा असल्याने त्याची किंमत पन्नास लाखावर असू शकते.
शेवंगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी इथेही अशाच प्रकारे लाखो रुपयांचा गांजा पकडण्यात आला होता. त्यानंतर पाथर्डी तालुक्यात गांजावर मोठी कारवाई करण्यात येत आहे. वृत्त प्रसारित होउस्तर कारवाई सुरूच होती. त्यामुळे निश्चित मुद्देमाल, त्याची एकूण बाजार किंमत आणि आरोपीं याबाबत माहिती उपलब्ध होण्यास काही अवधी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!