Sunday, October 11, 2026
Home ताज्या बातम्या पोल दुकानात की दुकान पोलात? जामखेडमध्ये नियम धाब्यावर! विजेचा खांबही अतिक्रमणात...

पोल दुकानात की दुकान पोलात? जामखेडमध्ये नियम धाब्यावर! विजेचा खांबही अतिक्रमणात बंदिस्त

0
2
पोल दुकानात की दुकान पोलात?  जामखेडमध्ये नियम धाब्यावर! विजेचा खांबही अतिक्रमणात बंदिस्त

जामखेड न्युज – – – – – – 

पोल दुकानात की दुकान पोलात?

जामखेडमध्ये नियम धाब्यावर! विजेचा खांबही अतिक्रमणात बंदिस्त

जामखेड शहरातील अतिक्रमणाने आता तर कहरच केला आहे. अतिक्रमण किती टोकाला गेले आहे याचा प्रत्यय देणारा धक्कादायक प्रकार बीड रोडवर समोर आला आहे. जिथे महावितरणचा मुख्य हाईटेन्शन लाईटचा पोलचक्क दुकानाच्या भिंतीत आणि आतमध्ये गाडला गेला आहे.

फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विजेचा मोठा खांब हा दुकानाच्या बांधकामात पूर्णपणे अडकला आहे. दुकानाची भिंत थेट पोलला चिकटून बांधण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे अतिक्रमणाचा अतिरेक असून, जीवितहानीचा मोठा धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे.

विजेच्या खांबाजवळ कोणतेही बांधकाम करणे हा नियमांचा भंग आहे, तरीही हे बांधकाम राजरोसपणे कसे झाले? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. चक्क पोल पुढे दहा ते वीस फूट अतिक्रमण दिसत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक खुपच चिडले आहेत. सर्व सामान्यांना वेगळा नियम व व्यापाऱ्यांना धनदांडग्यांना वेगळा नियम का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकारामुळे दोन गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रशासन काय करते?
शहरातील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, मुख्य रस्त्यावरच असे अतिक्रमण कसे काय उभे राहिले?

महावितरणचे दुर्लक्ष
आपल्याच खांबाभोवती बांधकाम होत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे कसे दुर्लक्ष केले?

या घटनेमुळे जामखेड शहरात जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तात्काळ या अतिक्रमणावर कारवाई करून तो पोल मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!