Sunday, October 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या बाजारपेठेतील विश्वासाचे नाव शितल कलेक्शन! रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर! जामखेडच्या शितल कलेक्शनची...

जामखेडच्या बाजारपेठेतील विश्वासाचे नाव शितल कलेक्शन! रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर! जामखेडच्या शितल कलेक्शनची १३ वर्षांची भरारी!

0
2
जामखेडच्या बाजारपेठेतील विश्वासाचे नाव शितल कलेक्शन! रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर! जामखेडच्या शितल कलेक्शनची १३ वर्षांची भरारी!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या बाजारपेठेतील विश्वासाचे नाव शितल कलेक्शन!

रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर! जामखेडच्या शितल कलेक्शनची १३ वर्षांची भरारी!

संस्कृती जपणारे वस्त्रदालन म्हणून जामखेड शहरासह तालुक्यात आपली ओळख निर्माण केलेल्या ‘शितल कलेक्शन – अंदुरे परिवार’ च्या १३ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

नगर रोड, जामखेड येथे असलेल्या शितल कलेक्शनने गेल्या १३ वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरत, गुणवत्तापूर्ण कपडे आणि उत्तम सेवा देण्याचा वसा जपला आहे.

एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारला असून, यामागे केवळ आणि केवळ ग्राहकांचा अढळ विश्वास असल्याचे मत संचालक अंदुरे परिवाराने व्यक्त केले आहे.

१३ वर्षांच्या या यशस्वी वाटचालीत जामखेडकरांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला. ग्राहकांचा हाच विश्वास हीच आमची खरी ओळख असून, ग्राहकांची साथ हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त शितल कलेक्शन परिवाराच्या वतीने सर्व ग्राहक, हितचिंतक आणि जामखेडकरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. तसेच यापुढेही अशीच सेवा आणि विश्वास जपण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

शितल कलेक्शन – अंदुरे परिवार
नगर रोड, जामखेड | मो. ८८०५०६३६११

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!