Thursday, October 1, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न! खर्डा रोड अतिक्रमण हटवा, रस्ता मोजणी करून रुंद करा...

जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न! खर्डा रोड अतिक्रमण हटवा, रस्ता मोजणी करून रुंद करा – संजय काशिद दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी मार्ग मोकळा करणे आवश्यक

0
2
जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न! खर्डा रोड अतिक्रमण हटवा, रस्ता मोजणी करून रुंद करा – संजय काशिद  दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी मार्ग मोकळा करणे आवश्यक

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न! खर्डा रोड अतिक्रमण हटवा, रस्ता मोजणी करून रुंद करा – संजय काशिद

दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी मार्ग मोकळा करणे आवश्यक

जामखेड शहर व परिसरावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत दहिगाव- जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेची जलवाहिनी खर्डा रोडमार्गे जामखेड शहरातील लक्ष्मी चौकापर्यंत पोहोचली असून, पुढील जलवाहिनी टाकण्याच्या कामात रस्त्यावरील अतिक्रमणांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी खर्डा रोडची शासकीय हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत आणि रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी भाजप शहर मंडळ अध्यक्ष संजय (काका) काशिद यांनी केली आहे.

याबाबत १ ऑक्टोबर २०२६ रोजी जामखेडचे तहसीलदार शितलकुमार सावळे यांना निवेदन देण्यात आले. दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या पुढील कामातील अडथळे तातडीने दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

भूमी अभिलेख कार्यालयामार्फत खर्डा रोडची अधिकृत मोजणी करून रस्त्याची शासकीय हद्द निश्चित करावी, अशी प्रमुख मागणी संजय काशिद यांनी केली आहे. मोजणीनंतर रस्त्याच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे नियमानुसार हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, जेणेकरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरळीतपणे आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करता येईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाला तातडीने मोजणीचे आदेश देऊन आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही काशिद यांनी तहसीलदारांकडे व्यक्त केली.

दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जामखेड शहराला पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जलवाहिनीचे काम महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे रस्त्याची मोजणी, अतिक्रमण हटविणे आणि रुंदीकरणाची कार्यवाही वेळेत झाल्यास पुढील जलवाहिनी टाकण्याचे काम अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी जामखेड नगर परिषदेचे भाजपा गटनेते तात्यासाहेब पोकळे, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, शहराध्यक्ष ऋषिकेश मोरे, तुषार बोथरा, तात्याराम मुळीक आदी उपस्थित होते.

आता प्रशासन खर्डा रोडची मोजणी करून अतिक्रमणांवर कोणती कारवाई करते आणि पाणीपुरवठा योजनेचे काम कितपत वेगाने पुढे सरकते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!