जामखेड न्युज – –
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जेईई आणि नीट परीक्षेची रँक लिस्ट जारी करताना विद्यार्थ्यांना समान गुण पडल्यास अधिक वय असणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्य देत जात होतं. मात्र, या वर्षी पासून हा नियम रद्द करण्यात आला आहे.
टायब्रेकरवर निकाल तयार व्हायचा
नॅशनल टेस्टिंग एजन्सी टाय ब्रेकर नियमाद्वारे निकाल तयार करत असे. यानुसार ज्या विद्यार्थ्याना समान गुण मिळालेले असायचे त्यांच्यामधील ज्याचं वय अधिक आहे, त्याला प्राधान्य देत त्याचं रँक लिस्टमध्ये अगोदरचं स्थान दिलं जायचं. मात्र, नीट परीक्षा 2021 आणि जेईई परीक्षा 2021च्या माहितीपत्रकात या संदर्भात बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एकूणचं या बदलामुळे वय अधिक असणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
NEET 2020 चा निकाल तयार करताना ऑल इंडिया टॉपर लिस्ट तयार करताना नव्या नियमाचा वापर करण्यात आला होता. कारण त्यावेळी केवळ दोन विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले होते. यानतर या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. टायब्रेकर नियमाच्यानुसार ओडिशाचा शोएब आफताब ऑल इंडिया रँक 1 तर यूपीच्या आकांक्षा सिंहला ऑल इंडिया रँक 2 मिळाली होती.
नव्या नियमानंतर रँक कशी बनवणार
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नियमानुसार विद्यार्थ्याचे सारखे गुण असल्यास त्यांच्या आवश्यक विषयातील गुण पाहिले जातील. त्यांचं वय पाहण्यापेक्षा सर्व विषयातील चुकीचे उत्तरं आणि बरोबर उत्तर यांच्या संखेच्या प्रमाणत प्राधान्य दिलं जाणार आहे. 2021 परीक्षेपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. टायब्रेकर नियमातील बदल एनटीएच्या माहितीपत्रकात पाहता येईल.
मातृभाषेत परीक्षा
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.






