श्री भैरवनाथ विद्यालय हळगावचे सेवानिवृत्त सहशिक्षक दत्तात्रय काकडे यांचे निधन
श्री भैरवनाथ विद्यालय, हळगाव येथील सेवानिवृत्त सहशिक्षक दत्तात्रय जगन्नाथ काकडे सर यांचे आज, रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. चेअरमन भारत काकडे यांचे ते चुलत बंधू होतू
काकडे सर यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने विद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, संचालक व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
त्यांच्या पार्थिवावर मुळगाव बोर्ला येथे आज दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.