Home ताज्या बातम्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका! जामखेड पोलिसांची कारवाई

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका! जामखेड पोलिसांची कारवाई

0
7
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका! जामखेड पोलिसांची कारवाई

जामखेड न्युज – – – – – – 

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका! जामखेड पोलिसांची कारवाई

 

जामखेड शहरात बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात जामखेड पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांच्या विशेष कारवाईत तब्बल १२ बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांत काही बुलेटस्वारांकडून वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालविली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या कर्णकर्कश आवाजामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास होत असल्याचेही समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांनी शहरात तपासणी मोहीम राबवत नियमबाह्य पद्धतीने आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई केली. या मोहिमेत १२ बुलेट पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आल्या.

बुलेटच्या सायलेन्सरचा मोठा आवाज करून रस्त्यावरून वाहन चालविणे हे केवळ नागरिकांच्या शांततेला बाधा आणणारे नसून वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जामखेड पोलिसांच्या या कारवाईमुळे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच लगाम बसला असून, शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे. यापुढेही नियमबाह्य सायलेन्सर आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बुलेटच्या सायलेन्सरमधून होणाऱ्या मोठ्या आवाजाविरोधात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये यापूर्वीही पोलिसांनी कारवाया केल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!