Saturday, August 15, 2026
Home ताज्या बातम्या साकतचे ज्येष्ठ वीणावादक बाळासाहेब भवर यांचे निधन, ४० वर्षांची वीणावादन सेवा थांबली...

साकतचे ज्येष्ठ वीणावादक बाळासाहेब भवर यांचे निधन, ४० वर्षांची वीणावादन सेवा थांबली अखंड वीणावादन सेवेतून विठ्ठलभक्तीची परंपरा जपली; साकत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

0
2
साकतचे ज्येष्ठ वीणावादक बाळासाहेब भवर यांचे निधन, ४० वर्षांची वीणावादन सेवा थांबली  अखंड वीणावादन सेवेतून विठ्ठलभक्तीची परंपरा जपली; साकत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

जामखेड न्युज – – – – – 

साकतचे ज्येष्ठ वीणावादक बाळासाहेब भवर यांचे निधन, ४० वर्षांची वीणावादन सेवा थांबली

अखंड वीणावादन सेवेतून विठ्ठलभक्तीची परंपरा जपली; साकत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

येथील गेल्या सुमारे ४० वर्षांपासून अखंडपणे वीणावादनाची सेवा बजावणारे बाळासाहेब किसन भवर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने साकत परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक निष्ठावान सेवेकरी हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

बाळासाहेब भवर यांचा जन्म १९६४ मध्ये पाटोदा गरड, ता. जामखेड येथे झाला. पुढे त्यांनी साकत येथे वास्तव्य करत गेल्या चार दशकांपासून नियमित वीणावादनाची सेवा सुरू ठेवली होती.

रात्री १२ ते पहाटे ३ तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत ते वीणावादनाची सेवा करत असत. अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने त्यांनी ही सेवा जपल्याने साकत परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.

अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी साकत येथील मुरूमकर स्मशानभूमीत नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळासाहेब भवर यांच्या पश्चात पुतण्या व भावजयी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांमधून दुःख व्यक्त होत आहे.

सावरण्याचा कार्यक्रम उद्या
बाळासाहेब भवर यांचा सावरण्याचा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता साकत येथील मुरूमकर स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!