जामखेड न्युज – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.
समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.जनआशिर्वाद यात्रा निमित्त नारायण राणे आज चिपळूनमध्ये आहेत. येथे नाशिक पोलिसांची टीम पोहचल्यानंतर त्यांना अटक करणार असल्याचे समजतेय. या सर्व घटनामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.
काय म्हणाले होते राणे?नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान, महाड येथील पाहणी केली. त्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दहीहंडी संदर्भातील प्रश्न विचारला होता. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बोलताना राणेंची जीभ घसरली, ते म्हणाले, ”ज्यांना स्वातंत्रदिन कधी आहे हे माहिती नाही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. त्यांनी अपशगुन्यांसारखं बोलू नये. त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवून बोलावे. स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वतंत्र्यदिनाच्या माहिती नसावी, असे आक्षेपार्ह वक्तव्य नारायणे राणे यांनी केले.”स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले






