जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
एप्रिल २०२१मध्ये झालेल्या एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्री नागेश विद्यालयाचे अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी आले आहेत .तर विद्यालयाचे ८ विद्यार्थी पात्र झाले. तसेच दहावी व बारावी मधील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकां समवेत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिती ए पी आय सुनील बडे, स्थानिक स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर,राजेंद्रजी कोठारी,केंद्रप्रमुख नारायण राऊत, प्राचार्य मडके बी के,मुख्याध्यापिका चौधरी के.डी.माजी विस्तार अधिकरी सुरवसे, उपप्राचार्य तांबे पी एन, पर्यवेक्षक साळवे डी.एन, सोनवणे,राजेंद्र गोरे ,प्रा रमेश बोलभट,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे,,एन.एम.एम.एस विभागप्रमुख सोमीनाथ गर्जे एनसीसी ऑफिसर मयुर भोसले , पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव ,संजय हजारे, दत्तात्रय ढाळे,रघुनाथ मोहळकर,भास्कर साळुंके, गोपाल बाबर , ज्ञानेश्वर लटपटे,संभाजी इंगळे,संतोष पवार,महादेव साळुंके, ज्ञानेश्वर शेटे ,अनिल धोत्रे, पापुभाई सय्यद व विद्यार्थी,पालक उपस्थित होते .
एन.एम.एम एस शिष्यवृत्ती धारक प्रत्येक विद्यार्थ्यांना चार वर्षात ४८००० हजार रु. मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे नावे खलील प्रमाणे आढाव स्वयंम महेंद्र -गुण ११६ (एस.सी.मध्ये जिल्हयात २ रा.),लोहार प्रज्वलशांताराम- गुण ११० (एन.टी.ब मध्ये जिल्हयात ३ रा) ,गर्जे सार्थक संपत – गुण-१५१ (खुला-मध्ये जिल्ह्यात१० वा) ,सार्थक बळीराम शिरसाट-१३३,माने सार्थक बाळू-१२७,धोत्रे सार्थक सूर्यभान-१२३,चिंचकर श्रीहरी अरुण-१०१,ओंकार अशोक शिरसाठ-८५, दहावी प्रथम तीन अनुक्रमे – हुंबे श्रीकांत सहदेव ९५.४० टक्के ,निकम रोहन गणेश ९४.८०,भालेराव संकेत सदाशिव ९१.६०,बारावी प्रथम तीन
कला शाखा -कु.साळवे ऋतुजा इजाक ७७टक्के, कु.खरात पल्लवी एकनाथ ७५ टक्के,कु.शेख मुस्कान हरूण ७४.१७,विज्ञान शाखा- कु. नाविदगी नाजनीन आयुब ९६.१७,कु.नेटके साक्षी महादेव ८८.१७,कु. मुरूमकर शितल नारायण ८६.३३
शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर श्री. तुकाराम कण्हेरकर साहेब, सहायक विभागीय अधिकारी श्री.वाळुंजकर साहेब व श्री.तापकीर साहेब आणि माननीय आमदार श्री. रोहित दादा पवार साहेब जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक मध्ये प्राचार्य. श्री. मडके साहेब यांनी
शिष्यवत्तीधारक अहमदनगर जिल्ह्याच्या ५४१ कोट्यापैकी ३५६ जागा रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाने प्राप्त केल्या. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी ६५.८% जागा एकट्या रयत शिक्षण संस्थेकडे आहेत. रयत म्हणजे गुणवत्ता हे सिध्द झाले आहे.नागेश मध्ये सर्व स्पर्धा परिक्षाची तयारी उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे.
ए पी आय सुनील बडे यांनी मनोगतात विद्यार्थी जीवनात स्पर्धा परीक्षा म्हणजे एम.पी.एस.सी.व यु.पी.एस.सी परीक्षांची पूर्वतयारी व भविष्यात अधिकारी होण्याची संधी आहे. स्वतःला सिद्ध करावेच लागणार आहे.अभ्यासात सातत्य असल्याने यश नक्कीच मिळते. असे मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचलन रमेश बोलभट तर आभार पर्यवेक्षक साळवे डी एन यांनी केले.






