Thursday, August 6, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये चारचाकी तोडफोड आणि घरात घुसून कोयत्याने हल्ला; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेडमध्ये चारचाकी तोडफोड आणि घरात घुसून कोयत्याने हल्ला; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
2

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये चारचाकी तोडफोड आणि घरात घुसून कोयत्याने हल्ला; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भाड्याने घेतलेल्या दुकानाच्या खाली करण्याच्या वादातून चौघांनी फिर्यादीच्या वाहनावर हल्ला करून तोडफोड केली आणि नंतर घरात घुसून कुटुंबियांना कोयता, काठी व दगडांनी मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी एकून आठ जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी समीर तैनुर खान (वय 38, व्यवसाय: मार्केटिंग, रा. सदाफुले वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते पत्नी, आई-वडील, भावंड व मुलांसह राहतात आणि मार्केटिंगचे काम करुन घर चालवतात. समीर यांना भाड्याने दिलेले दुकानदार हकीम आत्तार यांच्या मालकीचे असून, दुकान लवकर खाली करण्यासाठी त्यांच्याकडून सतत दमदाटी होत असल्याचे सांगितले आहे.

समीर यांनी म्हटले की, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेअकराच्या सुमारास ते आष्टीहून कामानिमित्त परत जामखेडला आले असता खर्डा रोडवर हकीम आत्तार यांची भेट झाली आणि दुकानाची चावी त्यांना देण्यात आली.

रात्री सुमारे साडेनऊ वाजता समीर आपल्या चारचाकी वाहनाने जात असताना खर्डा रोडवरील कॅफेनाज हॉटेलसमोर पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून येणाऱ्यांनी त्यांच्या वाहनावर कोयता व तलवारीने हल्ला करून वाहनाचे नुकसान केले.

यानंतर आरोपी चारचाकी व मोटरसायकलने समीर यांचे घर गाठून घरात घुसले आणि दगड, विटा व कोयत्याने समीर, त्यांच्या आई झकिया खान व वडील तैनूर खान यांना मारहाण करून जखमी केल्याचा समीर यांनी आरोप केला.

समीर यांच्या पाठीवर कोयत्याने वार केला गेल्याचेही दिले आहे. झकिया या पोहोचून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी त्यांनाही ढकलले आणि त्यांची गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण हकीम आत्तार यांनी जबरदस्तीने काढून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

घटनेवेळी शेजारी अलीशान जांगीर खान, फिरोज इस्माईल खान व वसीम नजिर खान यांनी हस्तक्षेप करून कुटुंबाला बचावले. आरोपींनी शिवीगाळ व जीव घालण्याच्या धमक्या दिल्यामुळे ते तेथून निघून गेले. जखमींना ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचार देण्यात आले.

या प्रकरणी मुजफर गनी आत्तार, हकीम आत्तार, अकीब उर्फ पिल्या आत्तार, साद आत्तार, आदर्श आत्तार, सोहेल जावेद आत्तार, आसिफ आत्तार आणि जईद जावेद आत्तार (सर्व रा. जामखेड) यांच्या विरोधात घरात घुसून मारहाण, वाहनाची तोडफोड, दागिने हिसकावणे, शिवीगाळ व जीव मारण्याची धमकी देणे अशी गुन्ह्यांची नोंद जामखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. संजय लोखंडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!