पै. विकास (काका) तनपुरे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त मोफत देवदर्शन यात्रा उत्साहात संपन्न
सामाजिक कार्यकर्ते पै. विकास (काका) तनपुरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त महिला व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली मोफत देवदर्शन यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.या यात्रेला परिसरातील महिला व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यात्रेदरम्यान भाविकांनी मायबा (बडेबाबा), वृध्येश्वर, मढी येथील श्री कानिफनाथ मंदिर, मोहटादेवी मंदिर तसेच गहिनीनाथ गड या पवित्र देवस्थानांचे दर्शन घेतले.
धार्मिक वातावरणात भाविकांनी पूजा-अर्चा करून सुख, समृद्धी व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
या उपक्रमामुळे महिला व विद्यार्थ्यांना विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, श्रद्धा आणि संस्कार वृद्धिंगत होण्यास हातभार लागत असल्याची भावना सहभागी भाविकांनी व्यक्त केली.
ही मोफत देवदर्शन यात्रा पै. विकास (काका) तनपुरे प्रतिष्ठान, शिऊर आणि हिंदवी उद्योग समूह, शिऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व सहभागी, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.