जामखेड न्युज – – –
राज्यात मागील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडला. राज्याच्या अनेक भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळालं. मात्र आता पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील पाच दिवस घेणार ब्रेक!
पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. मात्र जिथे हलक्या पावसाचा अंदाज आहे, त्या भागांत ढगाळ वातावरण राहिल. परंतु आठवडाभर चांगलं कमबॅक केलेला पाऊस आता चार ते पाच दिवसांसाठी ब्रेक घेणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या काही शहरांना आणखी पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पश्चिम किनारपट्टी आणि उ. महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता
आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केव्हा होईल पावसाचं कमबॅक?
राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पाऊस असेल पण पावसाचे प्रमाण कमी असेल. पाऊस पडले पण हलका ते मध्यम स्वरुपाचा असेल. पाऊस नसण्याची परिस्थिती सर्वसाधारण दहा दिवस असेल, तसेच सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं कमबॅक होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी सांगितलं आहे.






