जामखेडमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
देशभरात चर्चेत असलेल्या पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन डॉ. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. “सत्याचा आवाज दाबता येत नाही, तो जितका दाबाल तितक्याच ताकदीने पुन्हा उभा राहील,” असा संदेश देत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या डॉ. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळणारा पाठिंबा हा लोकशाही मूल्यांचा विजय आहे. त्यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरात डॉ. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून पाठिंबा व्यक्त केला जात असून, त्याच पार्श्वभूमीवर जामखेडमधील हे आंदोलन पार पडले.
पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक, बॅनर व पक्षाचे ध्वज घेऊन घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या पर्यावरण, लोकशाही आणि जनहिताच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तसेच त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत संविधानिक मार्गाने जनआंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.