Sunday, July 19, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यातील नाहुली येथे तीन शेळ्या चोरी; ₹२१ हजारांचा ऐवज लंपास, खर्डा...

जामखेड तालुक्यातील नाहुली येथे तीन शेळ्या चोरी; ₹२१ हजारांचा ऐवज लंपास, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

0
7

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड तालुक्यातील नाहुली येथे तीन शेळ्या चोरी; ₹२१ हजारांचा ऐवज लंपास, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील नाहुली (ब्रह्मनाथ वस्ती) येथे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील जाळीत बांधलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संजय बहिर (वय ३२, रा. ब्रह्मनाथ वस्ती, नाहुली, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० ते १९ जुलै रोजी सकाळी ६.०० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील जाळीत बांधलेल्या काळ्या रंगाच्या शिंग असलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्या.

सकाळी उठल्यानंतर शेळ्या दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली. नातेवाईकांनाही याबाबत माहिती दिली. मात्र शेळ्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर त्यांनी खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

चोरीस गेलेल्या शेळ्यांचे वय अंदाजे ४ वर्षे असून प्रत्येक शेळीची किंमत ₹७ हजार इतकी आहे. एकूण ₹२१ हजारांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी FIR क्रमांक ०११९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!