शितल कलेक्शनचा ‘मान्सून महाबचत सेल’ २० जुलैपासून; फ्रेश स्टॉकवर २५% तर सेल्स स्टॉकवर तब्बल ५०% पर्यंत सूट
जामखेड शहरासह अहिल्यानगर, बीड, सोलापूर, करमाळा व धाराशिव परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या शितल कलेक्शन, नगर रोड, जामखेड येथे २० जुलैपासून ‘मान्सून महाबचत सेल’ सुरू होत असून, ग्राहकांसाठी आकर्षक सवलतींची पर्वणीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेलमध्ये फ्रेश नवीन स्टॉकवर २५ टक्क्यांपर्यंत तर सेल्स स्टॉकवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देण्यात येणार आहे.
ही विशेष ऑफर २० जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार असून, ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे. शितल कलेक्शनमध्ये ग्राहकांच्या पसंतीनुसार प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक साईजमध्ये आकर्षक कपड्यांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. येथे पँट, शर्ट, टी-शर्ट, कुर्ते, सूट, शेरवानी, साड्या, रेडिमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल तसेच विविध फॅशनवेअर अत्यंत वाजवी दरात उपलब्ध असून, मान्सून महाबचत सेलमुळे ग्राहकांना आणखी मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे.
खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आरामदायी पद्धतीने खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
महाराष्ट्रात मुंबईची दहीहंडी, पुण्याचे गणेशोत्सव, अहिल्यानगरचा मोहरम आणि जामखेडची नागपंचमी हे उत्सव विशेष प्रसिद्ध आहेत. या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नवीन कपड्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी शितल कलेक्शनने ही विशेष मान्सून महाबचत ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे.
“नवनवीन फॅशन, दर्जेदार कपडे, परवडणारे दर आणि आकर्षक सवलती” हेच शितल कलेक्शनचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत, ग्राहकांनी आजच शितल कलेक्शन, नगर रोड, जामखेड येथे भेट देऊन मान्सून महाबचत सेलचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.
सदैव आपल्या सेवेत – अंदुरे परिवाराचे शितल कलेक्शन, नगर रोड, जामखेड.