जामखेड न्युज – – – – –
अशोक पठाडे हल्लाप्रकरणी निष्पक्ष तपास व कठोर कारवाईची मागणी

जामखेड तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक पठाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार तसेच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात अशोक पठाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





