जामखेड न्युज – – –
झायडस कॅडिलाला आज ZyCoV-D साठी DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोविड 19 साठी जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित डीएनएवर आधारित लस आहे. ही लस वय 12 वर्षे आणि त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाईल. याबाबतची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. भारतात वापरली जाणारी सहावी लस ठरणार आहे.
काय आहे ही लस?या लसीची भारतात सर्वांत मोठी चाचणी घेतली गेली होती. ५० हून अधिक केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. याप्रकारे एखाद्या भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिलीच डीएनएवर आधारित असलेली लस आहे. हा दावा झायडसने केला आहे. या लसीचे तीन डोस द्यावे लागणार आहेत. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती. देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.