Thursday, June 18, 2026
Home ताज्या बातम्या महाराणा प्रतापांच्या विचारांतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा – ॲड. डॉ. अरुण जाधव जामखेड येथे...

महाराणा प्रतापांच्या विचारांतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा – ॲड. डॉ. अरुण जाधव जामखेड येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

0
2

जामखेड न्युज – – – – – 

महाराणा प्रतापांच्या विचारांतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा – ॲड. डॉ. अरुण जाधव

जामखेड येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

“मेवाडरत्न वीर शिरोमणी महाराणा प्रताप हे स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक आहेत. प्रबळ सामर्थ्याच्या विरोधातही त्यांनी कधीही स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाशी तडजोड केली नाही.

संकटे, संघर्षाचा सामना करत त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.

जामखेड शहरात बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी मेवाडरत्न वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जामखेड नगर परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

“तरुण पिढीने संघर्षाची प्रेरणा घ्यावी” – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
“आजच्या तरुण पिढीने महाराणा प्रताप यांच्या जीवनातून संघर्षाची प्रेरणा, राष्ट्रप्रेमाची भावना आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ हीच प्रेरणा घ्यावी असे नगराध्यक्षा चिंतामणी यांनी सांगितले.

हळदीघाटीचे युद्ध असो वा जंगलात काढलेले दिवस – महाराणा प्रताप यांनी कधीही मुघलांपुढे मान तुकवली नाही. ‘मान गेली तरी चालेल, पण शान जाऊ देणार नाही’ हा त्यांचा बाणा प्रत्येक भारतीयाने अंगीकारला पाहिजे. स्वातंत्र्य फुकट मिळत नाही, त्यासाठी त्याग करावा लागतो हेच महाराणांचे जीवन आपल्याला शिकवते.”

मान्यवरांची उपस्थिती.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, गणेश डोंगरे, प्रविण होळकर,विकी पिंपळे, दत्ता राळेभात तसेच रवि पवार,शुभम साळुंके,विकास साळुंके,रवि साळुंके,विनोद साळुंके,शंकर पवार, लखन पवार, राहुल साळुंके,राम पवार,विकी साळुंके, निलेश पवार, ऋषिकेश साळुंके आदी महाराणा प्रताप मित्र मंडळ, जामखेड येथील समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!