जामखेड न्युज – – – – – –
सावरगांव हादरले : एकाच रात्रीत ६ ठिकाणी घरफोड्या, दीड लाखांचा ऐवज लंपास

सावरगांव, ता. जामखेड: येथे बुधवारी मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रमुख घटना : १ तोळे सोने व १.२ लाख रोख लंपास
१. विश्वनाथ किसन सपकाळ यांचे घर : चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे ही रक्कम बियाणे-खते खरेदीसाठी व जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जमा करून ठेवलेली होती. शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे पैसे गेल्याने सपकाळ कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

२. संदीप चिंचकर यांचे घर : येथून चोरट्यांनी ५ ग्रॅम सोने व १५ हजार रुपये रोख असा ऐवज रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला
३. कांताबाई आण्णा भांबे यांचे घर
४. शिवाजी आश्रु समुद्र यांचे घर
या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी दाराचे कोंडे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लोकांना जाग आल्याने व काही हाती न लागल्याने चोरट्यांनी पळ काढला.

याशिवाय गावातील इतर दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.



