जामखेड न्युज – – – – – – – –
प्राचार्य प्रा. विकी घायतडक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ Global Elite Media and Tech या संस्थेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला

गुणवत्तेची पोचपावती
प्रा. घायतडक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अथक प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले दूरदर्शी नेतृत्व*याची दखल घेऊन निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने प्लेसमेंट, संशोधन, तांत्रिक कार्यशाळा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ‘विद्यार्थी केंद्रित शिक्षणपद्धती’ हा त्यांचा मुख्य गाभा राहिला आहे.

“विद्यार्थी घडला, म्हणजे शिक्षक घडला”
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रा. विकी घायतडक म्हणाले, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण पॉलिटेक्निकच्या टीमचा, विद्यार्थ्यांचा आणि संस्थाचालकांचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन आम्ही काम करतो. ग्रामीण भागातील मुलांना
जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे हेच माझे ध्येय आहे.”



