सकाळचा वाफाळता चहा प्लास्टिकच्या ग्लासात आणि संध्याकाळची कुरकुरीत भजी कालच्या बातम्यांच्या कागदात… जामखेडकरांनो, तुम्ही पैसे देऊन विष विकत घेत आहात! FSSAI ने बंदी घालूनही शहरात बिनधास्त सुरू असलेल्या या दोन ‘आरोग्याच्या शत्रूंमुळे’ कॅन्सर, किडनी फेल, हार्ट प्रॉब्लेम सारखे जीवघेणे आजार वाढत आहेत.
१. प्लास्टिक ग्लासात चहा : १०० अंशावर मृत्यूचा घोट
धोका काय? 1. केमिकल रिअॅक्शन: प्लास्टिक ग्लास पॉलीस्टायरीन व पॉलीप्रॉपिलीन पासून बनतात. ६०°C वरील गरम चहा ओतताच स्टायरीन, बिस्फेनॉल-A (BPA), डायऑक्सिन सारखी ५२ हून अधिक घातक रसायने वितळून चहात मिसळतात.
2. शरीरावर परिणाम: ही रसायने थेट लिव्हर, किडनी, मेंदू वर हल्ला करतात. हार्मोनल इम्बॅलन्स, पुरुषांमध्ये वंध्यत्व, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, मुलांमध्ये वाढीचे विकार होतात.
3. FSSAI ची बंदी: FSSAI च्या २०१८ च्या आदेशानुसार गरम पदार्थांसाठी प्लास्टिक कप/ग्लास वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दंड ५ लाखांपर्यंत व ६ महिने जेल होऊ शकते.
जामखेडची स्थिती: बस स्टँड, खर्डा चौक, बाजारतळ, बीड रोड, नगर रोड येथील ९०% टपऱ्यांवर चहा प्लास्टिक ग्लासमध्येच दिला जातो. “काचेचा ग्लास फुटतो, स्टीलचा हरवतो, प्लास्टिक स्वस्त पडते” हे विक्रेत्यांचे उत्तर.
2. कॅन्सरचा थेट मार्ग: जागतिक आरोग्य संघटनेनुसार लेडमुळे ब्लड कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर* होतो. लहान मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम होतो. 3. जंतूंचे माहेरघर: रस्त्यावर पडलेला, अनेकांच्या हातून गेलेला, गोडाऊनमध्ये उंदरांच्या विष्टेने भरलेला पेपर तुमच्या ताटात येतो. टायफॉइड, कावीळ, जुलाब यांना आमंत्रण.
FSSAI चा नियम: २०१६ पासून अन्नपदार्थ गुंडाळणे, सर्व्ह करणे, झाकणे यासाठी वर्तमानपत्र वापरण्यास सक्त मनाई आहे.
-FDA झोपले, जनता मरतेय!
अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाकडे जामखेडसाठी वेळ नाही गेल्या १ वर्षात चहा-नाश्ता टपऱ्यांवर एकही कारवाई नाही. “तक्रार आली की बघू” हे ठरलेलं उत्तर. मात्र सामान्य माणूस रोज विष खातोय याची कोणाला फिकीर नाही.
जामखेडकरांनो, तुम्ही काय कराल?
ग्राहक म्हणून तुमचे ३ हक्क: 1. नकार द्या: “काकड, चहा काचेच्या कपातच द्या. भजी प्लेटमध्ये किंवा द्रोणात द्या. २ रु. जास्त घ्या, पण विष नको.” 2. स्वतःचा कप बाळगा: ऑफिसला, प्रवासात स्टीलचा छोटा कप/डबा सोबत ठेवा. 3. तक्रार करा: दुकानाचा फोटो काढून FSSAI टोल फ्री १८००-११-२१०० वर किंवा FoSCoS App वर तक्रार करा. नाव गुप्त राहील.
विक्रेत्यांनो, बदला: 1. चहासाठी: काच, स्टील, कुल्हड वापरा. प्लास्टिक ग्लास हद्दपार करा. 2. नाश्त्यासाठी: फूड ग्रेड बटर पेपर, ॲल्युमिनियम फॉइल, केळीचे पान, बांबूचे द्रोण वापरा. 3. दंड वाचवा: प्लास्टिक ग्लास वापरल्यास ५ लाख दंड + परवाना रद्द पेपर वापरल्यास २ लाख दंड. जेलची शिक्षा वेगळी.
डॉक्टरांचा इशारा: “जामखेडमध्ये गेल्या ३ वर्षांत पोटाचे कॅन्सर, किडनी स्टोन, लिव्हर सिरॉसिसचे पेशंट ४०% नी वाढले आहेत. २५-३५ वयोगटातील तरुण सर्वाधिक बळी पडताहेत. प्लास्टिक व शाई हे प्रमुख कारण आहे” – डॉ. संजय देशपांडे, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट, अहिल्यानगर.*
शेवटचा सवाल: २ रुपये वाचवण्यासाठी तुम्ही २ लाखाचे बिल हॉस्पिटलला भरणार का? चहाची चव ५ मिनिटे राहते, कॅन्सर आयुष्यभर पुरतो. आता ठरवा – आरोग्य महत्त्वाचे की सोय?