जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.मिसाळ वनश्री बाळू या विद्यार्थ्यांनीने 180 पैकी 154 गुण मिळवून जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला.तसेच कु.यादव वैष्णवी मदन ही विद्यार्थ्यांनीही 102 गुण मिळवून या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरली.
या विद्यार्थ्यिनींना शासनातर्फे प्रत्येकी 48000/- रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयाचे एकूण 19 विद्यार्थ्यी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते ,त्यापैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कु.मिसाळ व कु.यादव या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्या.
इतर विद्यार्थ्यांपैकी
कु.जगताप तन्वी नामदेव(114)
ढेपे स्वप्निल बळीराम (112)
ढेपे शुभम भारत (105)
झिंजाडे निरंजन काशिनाथ (102) हे विद्यार्थी100पेक्षा जास्त गुणांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा NMMS परीक्षेचा निकाल शेकडा 94.74 % लागला. विभागप्रमुख श्री. चांगुणे बी.एम,विषय शिक्षक श्री. मोमीन एस.जी,श्रीम.निबोरे व्ही.पी,श्री. बिरंगळ के.जी,श्री. शेळके एस.एस व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट, पर्यवेक्षक, कोल्हे एच.एन ,सर्व शिक्षक तसेच स्थानिक स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापण समितीच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.