Tuesday, June 2, 2026
Home ताज्या बातम्या साकत घाटातील दिशादर्शक फलक चोरीला : अपघातांची संख्या वाढली ‘धोकादायक...

साकत घाटातील दिशादर्शक फलक चोरीला : अपघातांची संख्या वाढली ‘धोकादायक वळण’, ‘वेग कमी करा’चे बोर्ड गायब; रात्रीच्या प्रवासात वाहनचालकांचा गोंधळ

0
2

जामखेड न्युज – – – – – 

साकत घाटातील दिशादर्शक फलक चोरीला : अपघातांची संख्या वाढली

‘धोकादायक वळण’, ‘वेग कमी करा’चे बोर्ड गायब; रात्रीच्या प्रवासात वाहनचालकांचा गोंधळ

बीड-जामखेड राज्य महामार्गावरील अपघातप्रवण साकत घाटातून ‘धोकादायक वळण’, ‘वेगमर्यादा २० किमी’, ‘खोल दरी’ असे सूचना देणारे दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर चोरीला गेले आहेत. फलक नसल्याने, विशेषतः रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांची दिशाभूल होऊन गेल्या महिनाभरात ५ अपघात घडले आहेत.

चोरी कधी, कशी?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनी सांगितले की, साकत घाटातरिफ्लेक्टर, कॅट-आई बसवले होते. पण मे महिन्याच्या सुरुवातीला पाहणी केली असता लोखंडी अँगल व अॅल्युमिनियमचे बोर्ड भंगारात विकण्यासाठी चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात गॅस कटरने कापून नेले.”

अपघात वाढण्याचे कारण
1. रात्री दृश्यमानता शून्य: घाटात ४ तीव्र ‘S’ आकाराची वळणे आहेत. रिफ्लेक्टर नसल्याने लाईटचा अंदाज येत नाही.

2. नवीन चालकांना धोका: पुणे, मुंबईकडून बीडकडे जाणारे ट्रक-ट्रॅव्हल्सचे चालक पहिल्यांदाच घाटात येतात. बोर्ड नसल्याने वळणाचा अंदाज न आल्याने थेट दरीच्या दिशेने जातात.

3. वेगमर्यादेचा फलक नाही: ‘घाट सुरू – वेग २० किमी’ हा बोर्डच गायब असल्याने वाहने सुसाट येतात.

गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात जखमी झालेला मीनी ट्रॅव्हल चे चालक म्हणाले , “रात्री २ वाजता पहिल्यांदा घाटात आलो. वळण आहे हे कळलेच नाही. दरी दिसली तेव्हा ब्रेक दाबला पण गाडी घसरली. चार जण जखमी झाले.
बोर्ड असता तर अपघात झाला नसता.

नागरिकांची मागणी
1. चोरीला गेलेले बोर्ड तातडीने बसवा व लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब वापरा.
2. घाटाच्या सुरुवातीला व शेवटी CCTV कॅमेरे बसवा.
3. भंगार माल खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा.
4. ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घाटात कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्र द्या.

सूचना:
साकत घाटातून जाणाऱ्या वाहनचालकांनी दिवसा प्रवास करावा, रात्री अपरिहार्य असेल तर वेग २० किमी/तास ठेवावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!