साकत घाटात यात्रेकरूची गाडी पलटी, चार जण गंभीर जखमी, वीस जण किरकोळ जखमी
घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी
मध्यप्रदेश येथील बऱ्हाणपूर येथून सुमारे 22 भाविक मिनी ट्रॅव्हल भाड्याने करून मुक्ताईनगर, शेगाव, औढा नागनाथ, तुळजापूर करून जेजुरी पुण्याकडे चालले होते. रात्री दोन च्या आसपास घाटात एका गाडीला ओव्हरटेक करून वळणाचा अंदाज न आल्याने गाडी संरक्षक कठडा व दिशादर्शक फलकाला धडक देऊन सरळ खाली खड्ड्यात पडली यात चौघे गंभीर जखमी झाले आहेत तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बऱ्हाणपूर येथून सुमारे 22 भाविकांना घेऊन मिनी ट्रॅव्हल डीडी 01 एएल 9777 औढा नागनाथ वरून जेजुरी पुण्याकडे जात असताना रात्री दोन च्या आसपास वळणाचा अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात पलटी झाली यावेळी एकच हाहाकार उडाला कोणाच्या हाताला जखम कोणाच्या पायाला जखम कोणाचे डोके फुटले कोणाचा हात तर कोणाचा पाय मोडला रात्री अंधारात आरडाओरडा सुरू होता यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुसर्या गाड्या थांबून सर्व जखमींना समोरून बाहेर काढले रूग्णवाहिकेस फोन करून जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यातील वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन व ड्रायव्हर गौरव महाजन हे चार जण जखमी झाले. यांच्यावर प्राथमिक उपचार करून नगरला पाठविले आहे सध्या ते नगर येथे उपचार घेत आहेत यातील वंदना व योगिता यांना पुणे येथे हातापायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवले अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. काही प्रवासी तर काचेतून बाहेर पडले.
अपघातातील अनेकांना मुका मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.
सध्या जामखेड पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक साकत मार्गे सुरू आहे. पण अरुंद घाटामुळे अवजड वाहनांना मोठी अडचण निर्माण होते. घाटात वळण लहान असल्याने गाड्यांना वळण बसत नाही.
जागतिक बँकेकडून करमाळा ते पाटोदा साकत मार्गे रस्ता सर्व्हे झाला आहे. यात करमाळा ते जामखेड चाळीस किलोमीटर रस्ता मंजूर झाला आहे. आता जामखेड ते पाटोदा साकत मार्गे लवकरात लवकर हा रस्ता सुरू व्हावा म्हणजे रूंद रस्ता व घाटाचे वळणे कमी करून चढ उतार कमी होतील. त्यामुळे लवकर रस्ता सुरू व्हावा अशी मागणी होत आहे.
साकत घाटात नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे वळणे कमी करून रस्ता रूंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. म्हणजे अपघात कमी होतील. अशी मागणी होत आहे.