Tuesday, June 9, 2026
Home ताज्या बातम्या इस्माईल युसूफ पठाण सर (आय वाय पठाण सर ) यांनी वयाच्या ८३...

इस्माईल युसूफ पठाण सर (आय वाय पठाण सर ) यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

0
38

जामखेड न्युज – – – – – – 

इस्माईल पठाण सर यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला

 

इस्माईल युसूफ पठाण सर ( आय वाय पठाण सर ) यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शहरातील 
 ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक आय वाय पठाण सर यांचे निधन.
तब्बल ३० वर्षे विद्यालयामध्ये हिंदी व कार्यानुभव विषयाचे अध्यापन मनोरंजकपणे करताना करताना विद्यार्थ्याच्या समस्या लक्षात मार्गदर्शन करण्याची वेगळीच हातोटी होती.

सेवानिवृत्ती नंतर आपल्या व्यवसायात पूर्णपणे झोकून देऊन व्यवसाय केला.
सर्व जाती धर्माच्या लोकांशी सलोख्याचे संबंध ठेऊन सर्वांशी आपुलकीने वागण्याच्या स्वभावामुळे सर सर्वांना आपलेसे झालेले होते.

त्यांचे मागे पत्नी, दोन मुले सर्फराज, अजहर. दोन मुली शेरीन, आफ्रिन 

अंत्यविधी कब्रस्तान, जामखेड येथे ठिक ७.०० वाजता होईल

चौकट

आय वाय पठाण सरांच्या जाण्याने शैक्षणीक विभागात पोकळी निर्माण झाली आहे . त्यांच्या पठाण कुटुंबाला या दुःखात सावरण्याची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.

(शिवाजीराव ढाळे – माजी अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!