Saturday, April 25, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड कृषी विभागामार्फत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे खरीप हंगामपूर्व व ‘साथी’ पोर्टल प्रशिक्षण...

जामखेड कृषी विभागामार्फत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे खरीप हंगामपूर्व व ‘साथी’ पोर्टल प्रशिक्षण संपन्न

0
6

जामखेड न्युज—–

जामखेड कृषी विभागामार्फत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे खरीप हंगामपूर्व व ‘साथी’ पोर्टल प्रशिक्षण संपन्न

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जामखेड येथील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले.

​याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी उपस्थित विक्रेत्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. खरीप हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशकांची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच, कायद्यातील विविध तरतुदींचे पालन करूनच व्यवसाय करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

​कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) श्रीमती शितल पाचारणे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे तांत्रिक विषयांचे सादरीकरण केले. यात त्यांनी खालील मुद्द्यांवर विशेष प्रकाश टाकला.

​साथी पोर्टल: नवीन ‘साथी’ पोर्टलचा वापर कसा करावा आणि त्यावरील नोंदणी किती महत्त्वाची आहे, याचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

​पॉस (POS) मशीन: सर्व अनुदानित खतांची विक्री ही अनिवार्यपणे ‘पॉस’ मशीनद्वारे व आधार द्वारेच झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

​तपासणी व कार्यवाही: कृषी विभागामार्फत होणाऱ्या तपासणीत कोणते मुद्दे विचारात घेतले जातात आणि त्रुटी आढळल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप ​हंगामपूर्व प्रशिक्षणाच्या या सत्राला जामखेड तालुक्यातील ६५ पेक्षा जास्त कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते. विक्रेत्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
खते बियाणे यांचा तुटवडा भासू नये,​कीटकनाशके हाताळताना घ्यायची काळजी, बोगस निविष्ठांना अटकाव आणि शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवणे, हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!