Home ताज्या बातम्या कृषी सहाय्यक समाधान सोनवणे यांचा सन्मान सन्मानामुळे शेतकऱ्यांसाठी जोमाने काम करण्याची...

कृषी सहाय्यक समाधान सोनवणे यांचा सन्मान सन्मानामुळे शेतकऱ्यांसाठी जोमाने काम करण्याची ऊर्जा – समाधान सोनवणे

0
6

जामखेड न्युज—–

कृषी सहाय्यक समाधान सोनवणे यांचा सन्मान

सन्मानामुळे शेतकऱ्यांसाठी जोमाने काम करण्याची ऊर्जा – समाधान सोनवणे

 

कर्जत उपविभाग, येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत साकत येथील कृषी सहाय्यक समाधान सोनवणे यांचा उत्कृष्ट व प्रामाणिक कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दि. १७ एप्रिल २६ रोजी हा कार्यक्रम झाला. 

.
या वेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र घुले, श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी चौधरी मॅडम, तसेच तालुका कृषी अधिकारी वाणी साहेब उपस्थित होते. कर्जत, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी सहाय्यक समाधान सोनवणे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साकत, कोल्हेवाडी, पिंपळीवाडी, कडभनवाडी, हनुमानवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य पिक पद्धती, कीडनियंत्रण, खत व्यवस्थापन याबाबत त्यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

समाधान सोनवणे यांच्या प्रामाणिक व सातत्यपूर्ण कार्यामुळे शेतकरी वर्गात विश्वास निर्माण झाला असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
बाळासाहेब वराट शेतकरी साकत

“हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे.शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, अडचणी सोडवणे, हेच माझे ध्येय

कृषी सहयाक साकत समाधान सोनवणे

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!