ऐतिहासिक खर्डा नगरीत महापुरूषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
युवा नेते आकाश बाफना यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेञातील मान्यवरांना सन्मान
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा नगरीत काल गुरूवार दि.16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा.येथील साठे नगरात महापुरूषांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फूले,राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे पुजन करून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बाबासाहेब मोरे यांच्या स्फृती पित्यार्थ युवा नेते श्री.आकाश बाफना यांच्या अध्यक्षतेखाली आणि खर्डा येथील भूमीपुञ
कवी,साहित्यिक,लेखक,संपादक,पञकार श्री.बाळासाहेब शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “सन्मान कर्तृत्वाचा..अभिमान शिवपट्टणचा” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच खर्डा ग्रामपंचायतच्या सफाई महिला कर्मचारी यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासू युवा नेते श्री.आकाश बाफना हे होते,त्यांनी महापुरूषांची संयुक्त जयंती उत्सव ऐतिहासिक खर्डा नगरीत साजरा होत असल्याबाबत कौतुक केले तसेच आदर्श महापुरूषांच्या जीवन कार्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश (भाऊ) जाधव व मुस्लिम मावळा शिवरायांचा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पञकार रिजवान बागवान यांनी केले होते.