Sunday, April 5, 2026
Home शैक्षणिक बातम्या वडिलांच्या आठवणींना ज्ञानाचा सुगंध, प्रथम वर्षश्राद्ध निमित्त शिंदे कुटुबियांचा आदर्श उपक्रम

वडिलांच्या आठवणींना ज्ञानाचा सुगंध, प्रथम वर्षश्राद्ध निमित्त शिंदे कुटुबियांचा आदर्श उपक्रम

0
2

जामखेड न्युज—–

वडिलांच्या आठवणींना ज्ञानाचा सुगंध, प्रथम वर्षश्राद्ध निमित्त शिंदे कुटुबियांचा आदर्श उपक्रम

फक्राबाद येथील ज्येष्ठ शिक्षण प्रेमी नागरिक स्व.श्रीधर लहानू शिंदे(दादा)यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त त्यांच्या कुटुंबीयांकडून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फक्राबाद या शाळेतील शाळा ग्रंथालय समृद्धी अंतर्गत बालवाचनालया साठी त्यांचे चिरंजीव गणेश शिंदे, महेश शिंदे व मुकेश शिंदे यांच्याकडून 100 पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलांना वाचन करण्याची सवय लागावी, वाचनातून मुलानी स्वतः ची शैक्षणिक करावी म्हणून ही पुस्तके भेट देण्यात आली. माझे वडील हे पुस्तक, पेपर वाचन करत असत, त्यामुळे मी पुस्तके भेट देत आहे असे गणेश शिंदे म्हणाले.

त्याचा आदर्श हा सर्वासाठी प्रेरणा देणारा आहे. असे राजीव मडके म्हणाले. यावेळी माझी विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष योगीनाथ जायभाय पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद उबाळे, उपाध्यक्ष महेंद्र जायभाय, मोहिनीराज आढाव, संतोष राऊत, परसराम राऊत, नितीन आढाव, मुख्याध्यापक हजारे, चौधरी सह शिक्षक उपस्थित होते.

वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तके भेट देणे हा एक अत्यंत उत्कृष्ट विचार आहे. भेटवस्तू म्हणून पुस्तके दिल्याने केवळ ज्ञानच मिळत नाही, तर ते आयुष्यभराचे सोबती बनतात.

शालेय जीवनात पुस्तक वाचन हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून, ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचा (बौद्धिक, भावनिक आणि भाषिक) पाया आहे. वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, एकाग्रता सुधारते आणि विषयांचे सखोल आकलन होण्यास मदत होते.

हे ज्ञानवृद्धीचे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम साधन आहे “शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान!”माजी विद्यार्थी विचार मंच वतीने शिंदे कुटुंबाचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!