Thursday, April 2, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे तसेच रस्त्यावरील पोलमुळे अपघाताची मालिका सुरूच...

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे तसेच रस्त्यावरील पोलमुळे अपघाताची मालिका सुरूच बीड रोडवर रस्त्यावरील लाईटच्या पोलला गाडी धडकली

0
2

जामखेड न्युज—–

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे तसेच रस्त्यावरील पोलमुळे अपघाताची मालिका सुरूच

बीड रोडवर रस्त्यावरील लाईटच्या पोलला गाडी धडकली

 

गेल्या तीन वर्षांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिने काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना ३६ महिने झाले तरी अपुर्ण काम आहे. काही ठिकाणी अर्धवट काम त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. रेडियम नाहीत. रस्त्यावर लाईटचे पोल आहेत. अर्धवट काम यामुळे तीन वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर रस्त्यावर लाईटच्या पोलला गाडी धडकून गंभीर अपघात झाला आहे.

तीन वर्षे झाले तरी काम पूर्ण होत नाही, अतिक्रमणे निघत नाहीत, रस्त्यावर लाईटचे पोल आहेत रस्त्याचे काम करताना लाईटचे पोल न हटवता काम पूर्ण केल्यामुळे अपघात घडत आहेत. ही केवळ चूक नसून, थेट प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचे उदाहरण आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण केले होते. त्यावेळी नियमानुसार काम होईल असे सांगितले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर लाईटचे पोल आहेत तर काही ठिकाणी लाईटच्या पोल भोवती अतिक्रमणे आहेत. रस्ता अपुर्ण आहे. आता हद्द निश्चिती खुण करण्याचे काम सुरू केले आहे. पोल कधी हटविणार अतिक्रमणे कधी निघणार आणि रस्ता कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कधी गाडी डिझायर वर धडकून गाडीने पेट घेऊन दोघे जळून खाक झाले होते. तसेच तीन वर्षांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. तीन वर्षांपासून काम पूर्ण होत नाही हीच शोकांतिका आहे.

जामखेड तालुका हा राजकारणातील ‘दिग्गज’ नेत्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार यांसारखे मातब्बर नेते इथे असूनही, स्थानिक समस्या आजही कायम आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे, पण ते अत्यंत संथ गतीने चालू आहे. यामुळे नेहमीच अपघात होतात यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव: दिग्गज नेते असूनही, जामखेड शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था (ड्रेनेज) आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत.

तीन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात यामुळे च वेगाने असलेली गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेकांना अपंगत्व आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!