जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी ट्रकची लूटमार करणारे आरोपी बारा तासात जेरबंद
जामखेड तालुक्यातील सावरगाव शिवारातील घटना
जामखेड तालुक्यातील सावरगाव शिवारात ट्रकला दुचाकी आडवी लावून, काच फोडून चाकूचा धाक दाखवून मारहान करून लुटमार करणारे आरोपीजामखेड पोलीसांनी १२ तासात केले जेलबंद केले. या पोलीसांच्या कामगिरी चे कौतुक होत आहे.
जामखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ३१/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे संतोष बिभीषन फरताडे धंदा ड्रायव्हर रा. सोमनाथ वाडी ता. जि. बीड यांनी फिर्याद दिली की, मी व बाळू शामराव तांबेरा. परांडा जि.धाराशिव असे ट्रक क्र. MH१४LX९९६९ ही मध्ये कोबंडीचे खादय घेवून पुणे येथून माजलगावकडे जात असताना दि. ३१/०३ /२०२६ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास जामखेड ते साकत रोडने जामखेड पासून ५ की मी अंतरावर स्पीड ब्रेकर आल्याने आम्ही गाठीचा स्पीड कमी केला तेंव्हा एक स्कुटीवरील स्वार हा त्याची स्कुटी घेवून आला व आमचे ट्रकसमोर समोर आडवी लावून आमची ट्रक थांबवली.
आमची ट्रक थांबल्यानंतर मोटारसायकलवर इतर तीन लोक आले व त्यांनी ट्रकची काच फोडून आम्हाला मारहान करून चाकुचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहीत्य काढून घेतले.
वरील फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. १७५ / २०२६ बीएनएस कलम ३०९(६),३२४(४), ३(५), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्हा घडले ठिकाणी एक मोटारसायकल ही लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सदरच्या मोटारसायकल वरून सदरचा गुन्हा हा इसम नामे १) शुभम सुर्यभान चव्हाण २ ) शुभम ज्ञानोबा चव्हाण, ३)राम अशोक अडाले व एक अल्पवयीन विधी संर्घषीत बालक सर्वरा. सावरगाव ता.जामखेड जि. अहिल्यानगर यांनी केला आहे.
आरोपींची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सदरची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस काँन्स्टेबल देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे अशांना देवून सदरचे पथकाने तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी नामे शुभम सुर्यभान चव्हाण व राम अशोक अडाले यांना सोनेगाव ता. जामखेड परिसरातनू ताब्यात घेतले तसेच आरोपी नामे शुभम ज्ञानोबा चव्हाण यास सावरगाव डोंगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे, पोसई पुष्कर कडू, पोलीस नाईक रविंद्र वाघ, देविदास पळसे, कुलदिप घोळवे, आकाश शेवाळे, पो.कॉ ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ भागीरथ देशमाने, पोकॉ दत्तु बेलेकर, पोकॉ इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी केली आहे.