जामखेड न्युज—–
फिरण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची चार चाकी गाडी पलटी, आठ जण गंभीर जखमी
जामखेड शहराजवळील घटना
अकलुज येथे वॉटरपार्कला जात असलेल्या विद्यार्थींच्या चारचाकी वहानाने शहरापासून तीन कि.मी.अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ वळणावर अंदाज न आल्याने या वहानाने अचानक दोन ते पलटी मारल्या. या चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात चालकासह एकुण आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे.
श्रेयश प्रल्हाद राजगुरू, चैतन्य भक्तराज राजगुरू, ओम महेंद्र राऊत, सौरभ बबन यवले, साहिल अंबिका जाधव, यश संतोष खेत्रे, अमिन शेख (सर्व रा. जामखेड) व वाहन चालक अशा आठ जखमींची नावे आहेत.

जामखेड तालुक्यात खर्डा शहराजवळ कालच एक भीषण अपघात झाला होता. यात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल होता ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा आज सकाळीच पुन्हा अपघात झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील नववी व दहावीचे विद्यार्थी हे अकलुज येथिल वॉटरपार्क या ठिकाणी फिरण्यासाठी चारचाकी वहान क्रमांक एम एच- १६ बी.व्ही ०१०४ याने रविवार दि २९ रोजी सकाळी सात वाजता चालले होते.

यावेळी त्यांचे चारचाकी वहान हे जामखेड शहरापासून तीन कीमी अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ आले होते. यावेळी वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व अचानक या वहानाने दोन ते तीन पलटी मारल्या यावेळी गाडीने रोडच्या बाजुला आसलेल्या लाईटच्या पोलला धडक दिली.

यानंतर बाजुच्या तारेचे कंपाउंड तोडुन गाडी आतमध्ये शिरली या वेळी अपघाताचा मोठा अवाज झाल्याने बाजुच्या वस्तीवरील लोक धावत आले व इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीच्या बाहेर काढले.







