Home ताज्या बातम्या जामखेड करांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल...

जामखेड करांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी दहीगाव पाणी योजनेची नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष पाहणी

0
4

जामखेड न्युज——-

जामखेड करांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

दहीगाव पाणी योजनेची नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष पाहणी

शहर व उपनगराच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उजनी बँक वॉटर दहीगाव पाणी योजनेची नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, जामखेड करांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले.

बुधवार दि. १८ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी दहीगाव येथे जाऊन पाहणी केली. शहरासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानल्या जाणाऱ्या या योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून एकूण ६६ किलोमीटरपैकी ५५ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ किलोमीटर कामात काही तांत्रिक अडचणी येत असून, त्या सोडवण्यासाठी नगरपरिषद पुढाकार घेत असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,जया संतोष गव्हाळे – सदस्य ( सभापती, महिला व बाल कल्याण समिती)उपसभापतीपदी सीमा रवींद्र कुलकर्णी, मोहन सिताराम पवार – सदस्य ( सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती)वैशाली अर्जुन म्हेत्रे -सदस्य (सभापती, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती ), श्रीराम अजिनाथ डोके – सदस्य (सभापती, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती), यांच्या सह मुख्याधिकारी अजय साळवे, गटनेते तात्याराम पोकळे, संजय काशिद, पवन राळेभात, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, संतोष गव्हाळे, सागर टकले, मनोज कुलकर्णी, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र चौधरी, अनिल चव्हाण तसेच ठेकेदार इगल इन्फ्राचे अनिल गुरूबक्सानी यांच्या सह नगरपरिषद अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली जामखेड ते दहिगाव पाणी पुरवठा योजना ही करमाळा तालुक्यातील दहिगाव येथील उजनी बॅकवॉटरमधून जामखेड शहरासाठी उद्दिष्ट २५० कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना आहे.

या योजनेअंतर्गत ६६.२५ किमी लांबीची भूमिगत पाईपलाईन, करमाळा रोडवर नगरसेवक तथा उपसभापती महिला व बालकल्याण समिती सीमा कुलकर्णी व भाजपा राज्य परिषद सदस्य मनोज कुलकर्णी यांनी दिलेल्या जागेते फिल्टर हाऊस आणि शहरात पाच ठिकाणी टाक्या उभारून पाणीटंचाई कायमची दूर करण्याचे उद्दिष्ट आहे. हरकत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्ग काढून जामखेड करांना २०२७ च्या दिवाळीपर्यंत उजनी धरणातून मुबलक व स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे चिंतामणी यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!